Tiranga Times

Banner Image

IND vs NZ : मोठा ट्विस्ट, टी 20I सीरिजसाठी 24 तासांआधी टीममध्ये अचानक बदल, कुणाची एन्ट्री?

#INDvsNZ #T20Series #TeamUpdate #CricketNews #TirangaTimesMaharastra
  • By Tiranga Times Marathi
  • Reported By: Admin
  • Updated: January 20, 2026

Tiranga Times Maharastra

 

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर आता टी 20I मालिकेचा थरार सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 5 टी 20I सामने खेळवले जाणार असून ही मालिका 21 ते 31 जानेवारीदरम्यान पार पडणार आहे. आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 पूर्वीची ही दोन्ही संघांची शेवटची मालिका असल्याने प्रत्येक सामन्याला विशेष महत्त्व आहे.

मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये होणार असताना त्याआधीच मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या सामन्याला अवघे काही तास बाकी असतानाच न्यूझीलंड संघात अचानक बदल करण्यात आला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या माहितीनुसार युवा ऑलराउंडर क्रिस्टियन क्लार्क याचा पहिल्या तीन टी 20I सामन्यांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या क्लार्कला आता टी 20I मालिकेतही संधी देण्यात आली आहे.

न्यूझीलंडचा स्टार ऑलराउंडर मायकल ब्रेसवेल दुखापतीमुळे अडचणीत आहे. तो संघात असला तरी पहिल्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. 

 

 

Breaking News:

Recent News: